ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या मुलीला 14 वेळा भोसकले, आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला

महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीला 14 वेळा भोसकले.केशवन असे 22 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याचाही मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे.

मयत मुलगी ही अठीकुलम येथील रहिवासी होती आणि अकरावीमध्ये शिकत होती. परीक्षा झाल्यानंतर ही मुलगी आपल्या नातेवाईकला भेटण्यासाठी गेली होती. त्याचवेळी आरोपीने तिला रेल्वे ओव्हरपासजवळ थांबवले. आरोपीला तिला प्रपोज केले. मात्र मुलीने नकार दिल्याने आरोपीने चाकूने 14 वेळा तिच्यावर वार केले.

मुलीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिथून पळ काढला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मुलीला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असले तरी प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

याबाबत कुटुंबियांनी माहिती देताना सांगितले की, केशवन हा बऱ्याच कालावधीपासून मुलीचा पाठलाग करत होता. जून 2021 मध्ये त्याने सदर मुलीचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला होता. या प्कररणी त्याच्याविरुद्ध पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

22 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago