ताज्याघडामोडी

१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर आरोपी अल्पवयीन असल्याचं सिद्ध; सुप्रीम कोर्टाकडून सुटका

हत्या प्रकरणात १७ वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर गुन्हेगार अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर दोषी व्यक्तीनं अर्ज दाखल करत घटनेच्या वेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.

घटना उत्तर प्रदेशातील आहे. आरोपीला खालच्या कोर्टानं हत्या प्रकरणात १६ मे २००६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचलं. उच्च न्यायालयात याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे दोषीनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानं २००९ मध्ये याचिका फेटाळून लावली.

२०२१ मध्ये याचिकाकर्त्यानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. घटना घडली त्यावेळी आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे मला जे जे कायद्याचा लाभ मिळायला हवा. माझी सुटका व्हायला हवी, अशी मागणी त्यानं केली. आरोपीनं दाखल केलेल्या हायस्कूल आणि इंटरमीडिएट प्रमाणपत्राची पडताळणी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं महाराजगंजच्या जे जे बोर्डाला दिल्या.

त्यानंतर जे जे बोर्डानं आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. घटना घडली त्यावेळी दोषी व्यक्ती अल्पवयीन होती. त्याचं वय १७ वर्षे ७ महिने २३ दिवस होतं, असं जे जे बोर्डानं अहवालात नमूद केलं.

सर्वोच्च न्यायालयानं जे जे बोर्डाच्या अहवालावर विचार केला. ‘दोषी व्यक्ती घटनेवेळी अल्पवयीन होता. जे जे कायद्याच्या अंतर्गत हा खटला चालल्यास त्याला कमाल तीन वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याची तरतूद आहे. मात्र या प्रकरणात आरोपीनं १७ वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे आता त्याला स्पेशल होममध्ये ठेवण्याची गरज नाही,’ असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि दोषी व्यक्तीच्या सुटकेचे आदेश दिले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago