‘फॅबटेक’ विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील- बाळकृष्ण शिंपूकडे

आजकाल आपल्या भारत देशात विदेशी कंपन्यांचे जाळे वाढत चालले असुन आपल्या देशातील साधन- संपत्ती  विविध स्वरुपात परदेशात जाऊ लागली आहे, यावर प्रतिबंध म्हणून प्रत्येक भारतीय नगरिकाने स्वदेशिचा अंगीकार केला पाहिजे,असे प्रतिपादन उद्योजक बाळकृष्ण शिंपूकडे यानी केले. फॅबटेक  पॉलीटेक्नीकने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, या वेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय आदाटे, प्राचार्य शरद पवार, प्रतिभा शिंपूकडे आदि उपस्थित होते.
शिंपूकडे परिवार आठ कंपनीचे मालक असुन उद्योजकता  यशस्वी होण्याचा कानमंत्र  यावेळी त्यानी दिला. त्याच प्रमाणे यशस्वी उद्योगासाठी  नवनवीन कल्पना,परवाना, मागणी,नुतनीकरण व जनरल मार्केटिंग कसे करावे यावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी  नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फॅबटेक कॉलेजला मुळातच औद्योगिक क्षेत्राचे पाठबळ  लाभल्यामुळे  हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी  तरुण उद्योजकतेला प्रेरीत करण्यासाठी भविष्यात आणखी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन  करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे  संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ .साहेबगौडा सांगनगौडर, प्रा. तन्मय ठोंबरे तसेच ,प्रा.तानाजी बुरुंगले यांनी परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago