जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
पंढरपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या सीमारेषा खालील नकाशात लाल रंगात दर्शविल्या असून या प्रभागाची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ५४४३ इतकी दर्शविण्यात आली आहे.यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १०६५ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १८७६ इतकी निर्देशित करण्यात आली असून पंढरपूर शहरातील ३६ नगरसेवकांच्या जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.प्रत्येक प्रभागातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने या २ जागा निश्चित केल्या जाणार असल्याने प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जमातीची सर्वाधिक १८७६ इतकी लोकसंख्या लक्षात घेऊन या प्रभातील १ जागा राखीव होऊ शकते. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठे बदल या प्रभाग रचनेत प्रस्तावित करण्यात आले असून जुनी पेठ चौक ते जयभवानी चौक ते क्रांतिचौक ते चंद्रभागेच्या पैलतीरावरील ओंकारनाथ देवस्थान ते ६५ एकर परिसर ते अंबिका नगर झोपडपट्टी ते १९७ ब झोपड्पट्टी परिसर ते जुनीपेठ तालिमींसमोरील बाजू ते जुनी पेठ चौक अशा सीमारेषा प्रभाग क्रमांक ४ च्या प्रारूप रचनेत दर्शविण्यात आल्या आहेत.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…