ताज्याघडामोडी

राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी शिवशक्ती सेनेत प्रवेश करणार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांच्या पत्नी  करुणा धनंजय मुंडे यांच्या नव्या पक्षाची स्थापना करोनामुळे लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांनी आज नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असे मुंडे यांनी सांगितले. त्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, त्यातील एक राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा मंत्री असल्याचे त्या म्हणाल्या.

 आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, न डगमगता माझे कार्य पुढे सुरू ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही येणार आहेत. त्यासाठी आमची त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. करोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago