ताज्याघडामोडी

मनसेला आणखी एक धक्का

काही दिवसापूर्वी पुण्यातील डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत मनसेला मोठा धक्का दिला होता.आता पुन्हा  मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले  राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा मनसेला मोठा धक्का मानला जातो. आज ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अतुल वांदिले म्हणाले, मनसे पक्ष विदर्भात वाढला नाही ही खंत आहे. आमची नाराजी राज ठाकरे यांच्यावर नाही. तर नाराजी ही दुसऱ्या फळीतील नेत्यावर आहे. दुसऱ्या फळीतील नेते कधीच आमच्याकडे दौरे करत नाहीत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम दिला जात नव्हता. मग अशा ठिकाणी थांबून उपयोग नाही, अशी कार्यकर्त्याची भावना होती. त्यामुळं राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अतुल वांदिले हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती.मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खालची फळी हे पक्ष वाढीसाठी मदत करत नव्हते.मुळे पक्षातील कार्यकर्ते आणि जनतेचा कौल लक्षात घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago