ताज्याघडामोडी

कॉफी शॉपवर पोलिसांची धाड, अश्लिल चाळे करताना ९ मुली आणि ६ मुलं ताब्यात

नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नांदेड शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पाँईटच्या नावाने दुकाने उघडली आहेत.

यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजूने अंधारमय खोली करून बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेरुन जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला-मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र कम्पार्ट बनविले आहेत.

राज मॉल येथील कॉपी शॉपच्या मालकासह दोघांवर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड शहरात छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी दामिनी पथक स्थापन करून अवैध पद्धतीनं कॉपी शॉप चालवणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago