ताज्याघडामोडी

राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

मुंबईसह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढतोय. कोरोना, ओमायक्रॉन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

या निर्बंधांमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का,अशी भिती सर्वसामांन्यामध्ये आहे. या लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन आणि इतर मुद्द्यांवरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन लावणार याबाबतची माहिती दिली आहे.

टोपे काय म्हणाले?   

“राज्यात जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावणार”, अशा स्पष्ट शब्दात आरोग्यमंत्र्यांनी लाॉकडाऊनबाबतचे संकेत दिले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी विविध मुद्द्यांवरुन प्रतिक्रिया दिली. 

ओमायक्रॉन दुप्पट वेगाने वाढतोय 

“राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होतोय. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही, गरज नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

निर्बंधांवरुन काय म्हणाले? 

राज्यात आज मध्यरात्रीपासून नियमावलीचं अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपहारगृह, सिनेमागृह आणि बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधांवरुन आरोग्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 

“एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उद्देशाने निर्बंध लागू करण्यात आले आहेत”,असं आरोग्यमंत्री म्हणाले.

राज्यातील लसवंतांची टक्केवारी

“राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस हा 87 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची टक्केवारी ही 57 टक्के आहे”, असं टोपे यांनी सांगितलं. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

10 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago