स्वेरीत प्रा. अमितकुमार शेलार यांच्या पुस्तकाचे डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर (संतोष हलकुडे)- स्वेरीचे माजी विद्यार्थी व माळेगाव (ता. बारामती) येथील प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांच्या ‘ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ’ या इंग्रजी भाषेमधून असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांचे पीएच.डी. साठी मुख्य मार्गदर्शक असलेले स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या हस्ते करण्यात आले.
           प्रा. अमितकुमार शेलार यांनी २०१४ साली स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग (कॅडकॅम) विभागातून पदव्युत्तर पदवी अर्थात एम.ई.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी  मार्गदर्शक म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाली. दरम्यान ‘अनुभवाचे बोल’ आणि ‘काल्पनिकता’ या विषयावर प्रा.शेलार यांनी ‘ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ’ या पुस्तकाचे लेखन केले. मैत्रीचे घट्ट नाते, सामाजिक उपक्रम व माणुसकी यासारख्या विविध विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक वाचकांच्या निश्चित पसंतीस उतरेल. प्रा. शेलार हे सध्या माळेगाव तंत्रनिकेतन महाविद्यालयात ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शेलार यांचे साधारण १५४ पानी अर्थात चौतीस हजार शब्दांचे सुंदर गुंफण असलेले हे पुस्तक संपूर्णपणे इंग्रजी भाषेत आणि सहज समजेल असे आहे. त्यांचे पुस्तक ‘नोशन प्रेस मेडीया प्रायव्हेट लिमिटेड’ने प्रसिद्ध केले असून या पुस्तकाची किंमत १९९ रु. आहे. तसेच हे पुस्तक https://notionpress.com/read/beautiful-encounter-in-life या व इतर लिंक वर देखील उपलब्ध असून पुस्तक मागणीनंतर जवळपास १३० हून अधिक देशात या पुस्तकाची उपलब्धता आहे. पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.राऊत, स्वेरीचे माजी विद्यार्थी प्रा. पुरुषोत्तम पवार, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago