ताज्याघडामोडी

राज्यातील सहकारी बँकांना राज्य सरकारचा दणका

राज्यातील सहकारी बँकांमध्ये वाहन चालक,शिपाई,वाचमन हे पदे वगळता पदांसाठी नोकर भरती करताना सहकार विभागाने तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी असे आदेश राज्याच्या सहकार  व पणन विभागाने आज काढले आहेत.
  शासनाच्या या आदेशामुळे राजकीय नेते,पदाधिकारी आदींशी संबंधित असलेल्या अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठी वशिले बाजी होत होती,अनेक ठिकाणी संचालक मंडळातील व्यक्तींच्या कुटूंबातील,नात्यातील लोकांचा नोकरी भरती करताना प्राधान्याने विचार केला जातो.हे कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालकांच्या मर्जीतील असल्यामुळे बँकेत वशिले बाजी आणि गैरकारभार होत असताना मौन बाळगून राहतात असाही आरोप सातत्याने होत आला असून गेल्या काही महिन्यात राज्यातील अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या,रिझर्व्ह बँकेने कारवाई केली अशा काही बँकांतील आर्थिक घोट्याळ्यात कर्मचारी वर्गाने केलेले दुर्लक्ष हेही एक कारण असल्याचे समोर आले आहे.तर अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचेही आरोप होताना दिसून येतात.त्यामुळे सहकारी बँकाच्या नोकर भरती बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात होती.
   आज शासनाने या बाबत आदेश काढला असून भरती परीक्षेसाठी लेखी व मौखिक परीक्षा घेतील जाणार असून सहकार विभाग यासाठी एका एजन्सीच्या माध्यमातून हि परीक्षा पडणार आहे.मात्र बँकेच्या व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक आदी पदासाठी बँकेस थेट नियुक्तीचे अधिकार कायम राहणार आहेत. 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago