ताज्याघडामोडी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार? इंधन GST च्या कक्षेत येण्याची शक्यता

पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जीएसटीमुळे होणार सामान्यांचा फायदा देशातील इतर सर्व वस्तू आणि सेवांप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवरही जीएसटी आकारण्याचा विचार सध्या केंद्रीय स्तरावर सुरू असल्याची चर्चा आहे. तसं झालं, तर पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीवर आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा कर कमी होऊन सर्वसामान्यांना निम्म्या दरात ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. हे आहेत निकष जीएसटीमधील नियमांमध्ये बदल करण्यासाठी जीएसटी समितीतील तीन चतुर्थांश सदस्यांची मंजुरी गरजेची असते. यामध्ये केंद्र आणि राज्यातील प्रतिनिधीदेखील आपलं मत नोंदवतील. मात्र पेट्रोल आणि डिझलेला जीएसटीच्या कक्षेत आणायला अनेकांचा विरोध आहे.

केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा मोठा वाटा पेट्रोल आणि डिझेलच्या करांमधून येत असल्यामुळे हा निर्णय होण्याची सध्या तरी शक्यता नसल्याचं अनेकांचं मत आहे.पेट्रोल डिझेलवरील अधिभार पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीपेक्षा तिप्पट कर त्यावर आकारले जातात. त्यामुळे 30 रुपयांच्या घरात मूळ किंमत असणारं पेट्रोल सर्वसामान्यांना मात्र 110 रुपये मोजून घ्यावं लागतं. पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याचे कर काढून टाकून जर ते जीएसटीच्या कक्षेत आणले, तर त्याचे दर सध्याच्या तुलनेत निम्मे होतील, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र हा धाडसी निर्णय केंद्र सरकार घेईल का, याबाबत अनेकांना साशंकता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago