ताज्याघडामोडी

चंदनतस्करीत चक्क सरपंचच निघाला आरोपी

चंदनतस्करी करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या चंदनतस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून, तो एका पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सहा किलो चंदन व दुचाकी असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

अमर नामदेव पवार (वय 30, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38, रा. एकलव्य वसाहत, राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कात्रडचा सरपंच बाबासाहेब शिंदे व मल्हारी नावाच्या एका तरुणाचे नाव समोर आले आहे.

चंदनाची विक्री करण्यासाठी दोनजण कात्रडकडे जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना याची माहिती दिली. त्यानंतर कात्रडकडे जाणाऱया रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱया अमर पवार व विजय पवार यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सहा किलो वजनाची चंदनाची लाकडे व दुचाकी हस्तगत करण्यात आली.

पोलीस तपासादरम्यान या चंदन तस्करीमध्ये बाबासाहेब शिंदे (रा. कात्रड ता. राहुरी) तसेच राहुरी खुर्द येथील मल्हारी नामक तरुण या दोघांचा समावेश असल्याची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. या घटनेतील बाबासाहेब शिंदे हा कात्रड ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

20 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago