ताज्याघडामोडी

हवामान विभागाचा पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड  जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

पुढील चार दिवस (दि २९, ३० ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ) राज्याच्या किनारपट्टी भागात आज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दि ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस बरसण्याबरोबरच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago