ताज्याघडामोडी

पंढरपूरमध्ये निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

पंढरपूरमध्ये निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना

विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

 

पंढरपूर, दि. 18 :-  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूर येथे येणार आहेत. यात्रा कालावधीत विविध संघटना, सामाजिक संस्था तसेच नागरिक आदींना मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी  विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर  आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहरासह लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत विविध संघटनेच्या मागण्याबाबत बेकायदेशीर जमाव होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन कराड नाका, पंढरपूर येथे निवेदन स्विकृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  या कक्षात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस.पी.तिटकारे व सहाय्यक कार्यकारी दंडाधिकारी  म्हणून एस.बी.साठे यांची नेमणूक केली आहे.

अधिक माहितीसाठी 993002326 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी श्री.ढोले व तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी  केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago