ताज्याघडामोडी

इतिहासाच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातून मुघलांना वगळले; आता ‘यांची’ थोरवी शिकवणार

 विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने इतिहासाच्या नव्या अभ्यासक्रमाची जुळणी केली आहे. युजीसीच्या या प्रस्तावित अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवण्यात आले असून त्यानुसार देशावरील मुस्लीम आक्रमकांचा इतिहास अभ्यासातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सम्राट अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा यूजीसीने तयार केला असून त्यावर आतापासूनच प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील राजकीय बाबींऐवजी धार्मिक बाबींवरच नव्या अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचा आरोप होताना दिसतो आहे.

तर भारतावर आक्रमण करणाऱ्या आणि येथील अनेक वास्तू उद्‌ध्वस्त करणाऱ्या आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे, असा दावा युजीसीकडून करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकांपर्यंतच्या इतिहासात विशेषत: हा बदल प्रस्तावित असल्याचे बोलले जाते आहे.
वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची शक्‍यता व्यक्‍त केली जातेय.

वैदिक काळातील भारत कसा होता, वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर विद्यार्थ्यांना धार्मिक बाबी शिकवण्यापेक्षा जातीव्यवस्था दूर करणारी आंदोलने, सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारा अभ्यास शिकवला जावा, अशी मागणी केली जाते आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago