कोतवाल आणि पोलीस पाटलाची सतर्कता,तावशी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश

पंढरपुर तालुक्यातील भीमा व माण नदीच्या काठावरील विविध गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यात पोलीस प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात यश आले आहे.गेल्या दोन महिन्यात पोटनिवणुकीचा बंदोबस्त आणि लॉकडाऊनच्या बंदोबस्ताची अतिरिक जबाबदारी पार पाडत असतानाच अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलीस खात्याने केलेल्या आहेत.मात्र याच वेळी गौण खनिज रक्षणाची जबाबदारी असलेल्या  महसूल खात्याकडून अगदी तुरळक कारवाया होताना दिसून येतात.ज्या गावात पोलिसांकडून कारवाई होते तेथील महसूलच्या तलाठी,मंडल अधिकारी यांची जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित असते.मात्र याबाबत कुठलेही कठोर पावले उचलले जात नसून बहुतांश तलाठी आणि मंडल अधिकारी हे कर्तव्याच्या ठिकाणी निवासी राहणे बंधनकारक असताना देखील या नियमाचे पालन करीत नाहीत अशी चर्चा सातत्याने होत आली आहे.तर कोतवाल आणि पोलीस पाटील हे गावातच असल्यामुळे अवैध वाळू होत असल्यास त्यांच्याकडून तातडीने माहिती मिळण्याची अपेक्षा महसूल व पोलीस खात्यास असते.
          पंढरपुर तालुक्यातील तावशी येथील कोतवाल आणि पोलीस पाटील यांनी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी दक्षता बाळगत दिनांक ८ जून रोजी  वाळु चोरी होवू नये या अनुशंगाने गावात पाहणीसाठी  गावचे पोलीस पाटील कविराज आसबे  हे गावातील खंडोबा मंदिराशेजारी आले असता, सुधाकर माणिक हिल्लाळ,वय 35 वर्शे, व्यवसाय कोतवाल मौजे तावशी, रा.तावशी ता.पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि. 08/06/2021 रोजी रात्री 09/15 वा.चे सुमारास एक अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी छोटा हत्ती येत असताना दिसले. संशय आल्याने थांबवून पाठीमागील हौदयात जावून पाहणी केली असता त्यात वाळु दिसून आली. त्यांचेकडे वाळुचे रयल्टी, परवानाबाबत चैकशी केली असता त्यांनी वाळुच्या वाहतुकीचा परवाना, रयल्टी काही एक नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस फोन लावून घडला प्रकार कळविलेनंतर पोहेक1740 काळे, पोना 1608 माळी, चालक पोना 42 भोसले असे सर्वजण आल्यानंतर त्यांना सविस्तर घडला प्रकार सांगून सदरचे वाळुचे वाहन आरटीओ नं. MH 21 X 3282 व त्याचे पाठीमागील हौदयात शासनाची चोरीची रु. 3000/- किं.ची अर्धा ब्रास वाळु-रु. 2,53,000/- हे कारवाईसाठी पोलीस ठाणेस आणून लावण्यात आले आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाचा अशोक लेलंड कंपनीचा चारचाकी छोटा हत्ती वाहन व वाळु हे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणेस आणून लावले आहे. या प्रकरणी चारचाकी छोटा हत्ती वाहन नं. MH 21 X 3282 मध्ये अवैधरित्या, चोरुन, बेकायदेशीरपणे, संगनमत होवून उपसा करुन वाळु वाहतूक करीत असताना मिळाल्याने 1) नवनाथ अशोक पवार रा.षिरसी ता.मंगळवेढा जि.सोलापूर 2) शुभम केराप्पा नागणे रा.बायपास रोड मंगळवेढा ता.मंगळवेढा यांचेविरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.    
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago