नेमतवाडी येथे सव्वा लाखाची धाडसी चोरी

करकंब/ नेमतवाडी येथ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत पवार यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीच्या दाग-दागिने व रोख रक्कम अशी सुमारे एक लाख साडे अकरा हजाराची चोरी केल्याने नेमतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चंद्रकांत पवार हे आपली पत्नी, मुलगी व नातू यांच्यासह नेमतवाडी येथे राहतात त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त परगावी असतात सध्या लोकडाऊन असल्याने त्यांची सून व दोन नातू हे नेमतवाडी येथे असतात नेहमीप्रमाणे चंद्रकांत पवार हे आपल्या कुटुंबियासमवेत जेवण करून झोपले असता शुक्रवार दिनांक 4 च्या मध्यरात्री पहाटे जाग आली असता पाहिले तर कपाटातील वस्तू,साहित्य विस्कटलेले दिसले सर्वाना उठवले व चोरी झाल्याची खात्री करून पाहिले असता 20,000 रु किमतीचे सोन्याची बोरमाळ,20,000 रुपयांचे सोन्याचे गंठण 15 हजार रुपयांचे एक गंठण, 20,000 रुपये किमतीच्या सोनीच्या अंगठ्या,10,000 रुपये किमतीचे सोन्याचेकानातील ,5000 रुपये किमतीचे कानातील दागिने,17,500 रुपये चे चांदीचे पायातील दागिने व 20,000 रुपये रोख असा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार करकंब पोलिसात दिली असून पुढील तपास स.पो.नि.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मयूर गव्हाणे करीत आहेत

[शुक्रवारी मध्यरात्री या चोरीबरोबर दोन ते तीन ठिकाणी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु लोक जागे असल्याने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समजते]

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

18 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago