ताज्याघडामोडी

बाॅडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड यांचे ३४ व्या वर्षी  करोनामुळे निधन

कोरोना हा किरकोळ आजार आहे त्याचा बाऊ केला जातोय असे म्हणणारे काही महाभाग दिसून येतात त्यांचे डोळे उघडतील असा एक दुर्दैवी बळी कोरोनाने घेतला असून मराठमोळे बाॅडीबिल्डर जगदीश लाड यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात जगाचा निरोप घेतला.  

    नवी मुंबईत राहणारे जगदीश लाड यांनी गेल्या वर्षांपासून बडोद्यात वास्तव्यास होते व तेथे त्यांनी व्यायामशाळा देखील सुरु केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती.त्यांची प्रकृती गंभीर होत गेली  आणि यातच अखेर त्यांचे निधन झाले.

      जगदीश लाड यांनी  नवी मुंबई महापौर श्री चा किताब जिंकला होता. चार वेळा महाराष्ट्र श्री सुवर्णपदक, तसेच मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवले होते.

       त्यांच्या निधनाच्या वार्तेनंतर  महाराष्ट्र बाॅडिबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. एक नावाजलेला मराठमोळा बाॅडिबिल्डर अवेळी गेल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago