ताज्याघडामोडी

कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त

पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य सरकारसाठी सीरमने आपले दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता 400 ऐवजी 300 रुपयांना दिली जाणार आहे. म्हणजे 100 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

राज्य सरकारसाठी कोरोना लशीची किंमत प्रति डोस 400 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आल आहे.

ही किंमत तात्काळ लागू आहे. यामुळे राज्य सरकारचा हजारो कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होईल आणि अनेकांचा जीव वाचेल, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं.

दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त आहे. अमेरिकेतील कोरोना लशीचा एक डोस 1500, तर रशिया आणि चीनमधील कोरोना लशीचा एक डोस 750 रुपयांना आहे. त्या तुलनेत भारतातील कोरोना लस खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे, असं पूनावाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago