ताज्याघडामोडी

पंढरपूरातही होणार कोरोना रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी

कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले.           

कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी शासनाने दरसूची जारी केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी होते अथवा नाही यासाठी प्रत्येक बिलाची पडताळणी आवश्यक झाली आहे.दरम्यान, या सर्व हॉस्पीटलच्या बिलाचे अंकेक्षण केले असता शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्याची बाब गतवर्षी उघडकीस आली होती तर अनेक वेळा रुग्णाचे नातेवाईकही या वाढीव व अवाच्या सव्वा बिलाबद्दल तक्रार करताना दिसून येतात. काही रुग्णालयांनी पी.पी.ई.किट चे दर शासन दरापेक्षा अधीक लावला आहे तसेच काही रुग्णालयांनी साधे बेड,ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडचे दर तसेच फिजीशीयन व्हीजीट दर नेहमीच्या अथवा शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा भरमसाठ लावल्याच्या तक्रारी शासनस्तरावर प्राप्त होत आहेत.      

खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल.  शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल अशी घोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोलापूर भेटीवर असताना केली होती.मात्र आता या दुसऱ्या लाटेस सुरुवात होऊन महिना लोटला तरी अध्यापर्यंत कार्यवाही होत नव्हती.या बाबत पंढरी वार्ताच्या वतीने काल प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला होता.

CamScanner 04-28-2021 11.18.08
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago