ताज्याघडामोडी

प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा…’,

नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे.

निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवलं. या पत्रात म्हटलं, की या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आयोगाच्या असं लक्षात आलं आहे, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या बैठका आणि प्रचारादरम्यान आयोगाकडून जारी करण्यात आलेले निर्देश पायदळी तु़डवले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यासारख्या नियमांचंही पालन होत नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

पत्रात म्हटलं आहे, की स्टार प्रचारक, नेते किंवा उमेदरावारांसह निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या संख्येत उपस्थित राहाणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं थेट इशारा दिला, की निर्देशांचं पालन न करणाऱ्या उमेदवारांच्या, स्टार प्रचारकांच्या आणि नेत्यांच्या सभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचं पाऊलही आयोग उचलू शकतं.निवडणूक आयोगानं नेत्यांना दिला इशारा

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

20 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago