252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी हि जागा कॉग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठाकडे करणार असल्याचे सांगत जर या बाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर येथील कॉग्रेसचे नेते वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही नागणे यांनी दिला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी भारत भालके याना जाहीर झालेली असतानाही कॉग्रेसकडून शिवाजी काळुंगे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.पुढे काळुंगे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला पण त्यांची उमेदवारी कायम राहिली.व हाताचा पंजा या कॉग्रेसच्या चिन्हावर ते लढले.पंढरपूरच्या सभेत सुशीलकुमार शिंदे यांनी या बाबत स्पष्टीकरण देत आम्ही भालके यांच्यासोबत असल्याचे सांगितले आणि केवळ ७ हजारच्या आसपास मते घेऊन काळुंगे पराभूत झाले.मंगळवेढा येथील जनसंवाद सभेत कॉग्रेसच्या नेत्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी आपल्याला पुढच्या भगिरथदादांना आमदार झालेलं पाहायचाय अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच आता त्यांच्याच पक्षाच्या नितीन नागणे यांनी विसंगत भूमिका मांडल्याने नागणे यांचा बोलविता धनी कोण याची चर्चा मतदार संघात होऊ लागली आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…