ताज्याघडामोडी

२६ मार्च पासून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, दि.१७/०३/२०२० पासून भाविकांना श्रींचे दर्शन बंद करण्यात
आले होते. मा.राज्य शासनाच्या आदेशानुसार दि.१६/११/२०२० पासून भाविकांना फकत श्रीचे मुखदर्शन उपलब्ध
करून देण्यात येत आहे. मा.जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर
यांनी त्यांचेकडील क्र.२०२१/डिसीबी/०२/आरआर/१२४६ दिनांक २५/०३/२०२१ अन्वये फोजदारी प्रक्रिया
संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०७.०० या वेळेत सुरू राहतील असे नमुद आहे.

त्यानुसार आज शुक्रवार, दिनांक २६/०३/२०२१ पासून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना सकाळी
०७.०० ते संध्याकाळी ०७.०० या वेळेत दर्शनासाठी खुले राहील. सकाळी ०७.०० पूर्वी व संध्याकाळी ०७.००
नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे बुकोंग केलेल्याच
भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल व ही दैनंदिन संख्या १५०० एवढी मर्यादित राहील. तसेच शनिवार व
रविवार दिवशी देखील भाविकांना मंदिर सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०७.०० या वेळेत दर्शनासाठी खुले
राहील. श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही
प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत
आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला
आहे.

सदरचे पत्रक मा.सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम,
श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्‍वर देशमुख
(जळगांवकर), अँड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, श्री.अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव
मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष
श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago