सहारा बार परमिटरूम चालकाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य शासन अलर्ट झाले असून आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंतच दुकाने उघडे ठेवता येणार आहेत.हॉटेल ,बार परमिटरूम चालकांनी पन्नास टक्के क्षमेतनेच ग्राहकांना प्रवेश दयावा असे आदेश दिले आहेत.
      जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी होते कि नाही याची तपासणी करण्यासाठी पंढरपूर शहर  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सहारा बार परमिटरूम येथे गेले असता  तेथे लोकांची गर्दी दिसली तसेच तापमापक मशिनचा वापर करीत नसल्याचे दिसुन आले.या प्रकरणी बार मालक लक्ष्मण संभाजी बागल वय-55वर्षे,रा-गादेगाव,ता-पंढरपूर यांच्या विरोधात भादवि क.188,269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago