सावरकर चौकातील रोजच्या वाहतुक कोंडीला नागरिक वैतागले

पंढरपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा चौक समजल्या जाणार्या सावरकर चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्या अबालवृध्दांना व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व नविन व जुन्या बसस्थानकाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असून राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेस याच मार्गाने ये-जा करीत असतात.येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतुक शाखेने या चौकात सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी हे सिग्नल बंद असल्याचे दिसून येते.त्याच बरोबर खोमणे गुळाचा चहा दुकानापासून ते रंगोली हॉटेल पर्यंतचा परिसर हा नो पार्कींंग झोन असला तरी चारचाकी वाहने ऐन गर्दीच्या वेळी खुशाल उभी केली जात असून याचा वाहनचालकांना व पादचार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यापासून शहर वाहतुक शाखेकडून शहरात दुचाकी चालकांवर मोठया प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसून येते मात्र केवळ दंड वसुली हेच वाहतूक शाखेचे काम नसून शहरातील किमान नो पार्कींगचे फलक लावलेल्या ठिकाणी तरी अस्ताव्यस्त वाहने पार्कींग केले जाणार नाहीत याची दक्षता वाहतुक शाखेने घेतली पाहीजे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

शहरातील काही प्रमुख चौकातील वाहतुकीची कोंडी हा सातत्याने टिकेचा विषय झाला असून सावरकर चौक हा त्यापैकी एक आहे.निदान सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी तरी या ठिकाणी नो पार्किग झोनची कठोर अमलबजावणी केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे.    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago