पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व आढीव येथील एनटीपीसीचे वीज वाहक टॉवर प्रति टॉवर दोन लाख प्रमाणे ८५ लाख रुपयांची मागणी करूनही दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाड आणि त्याच्या गॅस कटरच्या वापर करीत पाडून टाकले आहेत अशा आशयाची फिर्याद एनटीपीसीचे अधिकारी के वमसी मोहन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, काही दिवसापूर्वी राष्ट्रीय औष्णिक विद्युत मंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व आढीव परिसरातील वीज पारेषण टॉवर गॅस कटरच्या साहाय्याने पाडून टाकण्यात आल्याची घटना घडली होती.या घटने नंतर या मागील वेगळाच प्रकार दाखल तक्रारीतून पुढे आला असून राजकीय वलय असलेला व नेता म्हणून वावरणारा रामभाऊ गायकवाड याने २७ फेब्रुवारी २०२१ रोजी ९१३१३६३१९२ या मोबाईल क्रमांकावरून वरिष्ठ प्रबंधक जयवर्धन शेखावत याना फोन करून काही तरी पैसे द्या आम्ही कामास आडवे येणार नाही असे बोलणे केले होते.मात्र यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही,८५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून रामभाऊ गायकवाड याने गॅस कटरच्या साहाय्याने टॉवर पाडले अशी फिर्याद एनटीपीसीचे अधिकारी के वमसी मोहन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…