ताज्याघडामोडी

बिल थकबाकीदारांची वीज तोडणार, ;ऊर्जामंत्री राऊतांची माहिती

थकीत वीज बिलांच्या जोडण्या तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उठवली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विरोधकांनी मागणी केल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. अधिवेशन संपताच ती उठवण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीस हुलकावणी देण्यात आली आहे.

‘महावितरणची आर्थिक स्थिती ढासळण्यास मागील सरकार कारणीभूत असून कर्ज दुप्पट आणि थकबाकी तिप्पट झाली आहे’, असा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केला. मार्च २०२० मध्ये महावितरणची एकूण थकबाकी रु. ५९,८३३ कोटींवरून डिसेंबर २०२० अखेर ती रु. ७१,५०६ कोटी असून जानेवारी २०२१ अखेर कर्ज ४६,६५९ कोटी एवढे असल्याचे ते म्हणाले.

अधिवेशनाच्या सुरुवातीला राणा भीमदेवी थाटात वीज तोडणीला स्थगिती देण्याची घोषणा करून शेवटच्या दिवशी स्थगिती उठवली ही राज्य सरकारची सर्वात मोठी लबाडी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. सभागृहात दिलेले आश्वासन पाळले नसल्याने हक्कभंग प्रस्ताव अाणू, असे ते म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago