गुन्हे विश्व

पंढरपुरात भल्या पहाटे मार्केट यार्डातून मोटारसायकलची चोरी

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक ठिकाणी अथवा घरासमोर लावलेली दुचाकी लंपास करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.गर्दीचे ठिकाणे हेरून मोटारसायकल चोर आपली करामत दाखवत असल्यामुळे दुचाकी मालकांचे टेन्शन मात्र चांगलेच वाढले आहे.अशातच मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात अशी खंतही अनेक दुचाकी चोरीस गेलेले नागरिक खाजगीत व्यक्त करताना दिसून येतात.
               लक्ष्मी टाकळी येथील एक किरकोळ भाजी विक्रेता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भल्या पहाटे ठोक भाजी खरेदीसाठी आला खरा पण एच.एफ.डिलेक्स कंपनीची मोटर सायकल काळ्या रंगाची गाडी सिलव्हर रंगाचा पट्टा असलेली नं.MH 13 BW 6726 ही हँन्डल लाँक करून मार्केट यार्ड येथील गरीब नवाज या हाँटेल समोर लावून भाजी खरेदीसाठी गेला असता हि दुचाकी दिनांक ३ मार्च रोजी चोरीस गेली आहे.या या बाबत दिनांक 09/03/2021 रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रमांक 136 नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.       
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago