ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांची हैद्राबाद व मुंबईच्या औषध निर्माण कंपनींमध्ये निवड

स्वेरी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांची हैद्राबाद व मुंबईच्या औषध निर्माण कंपनींमध्ये निवड

 

पंढरपूर- येथील स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीच्या रणजितसिंग रावसाहेब चौगुले व अक्षय बाळासाहेब पाटील या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील कोप्रान फार्मास्युटिकल कंपनीत प्रोडक्शन ऑफीसर म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच हैद्राबाद येथील ल्युटीअस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत स्वेरी फार्मसीच्या सागर दामू पिसे व स्वप्नील शिवाजी राऊत या दोन विद्यार्थ्यांची रिसर्च ट्रेनी इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ या पदावर निवड करण्यात आलेली आहे. 

           फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटक्वालिटी कंट्रोलप्रोडक्शनमार्केटिंग इ. विविध विभाग असतात. यापैकी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागांमध्ये औषध निर्मिती व त्याबाबतचे संशोधन हे नेहमीच सुरू असते. त्यामुळेच औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे एक प्रकारे कंपनीचे ब्रेन म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच उद्योगनोकरी अथवा स्वतःचा बिझनेस यापैकी कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करावे यासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीकडून नियमितपणे विविध शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियारशैक्षणिक समन्वयक प्रा. रामदास नाईकनवरेप्रा. वृणाल मोरे व ट्रेंनिग व प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तकॅम्पस इन्चार्जस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago