ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ऋतुजा पाटील दुहेरी सुवर्ण पदकाने सन्मानित

पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये शिकत असलेल्या ऋतुजा नागेश पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक’ व ‘श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक ’ या दुहेरी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे.

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून स्वेरीच्या स्थापत्य (सिव्हील) अभियांत्रिकीच्या सर्व विषयांमधून सर्व प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्यामुळे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर पुरस्कृत असलेला ‘डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक’ हा पुरस्कार ऋतुजा पाटील यांनी पटकावला. तसेच सर्व विषयांमध्ये सर्वाधिक सीजीपीए गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल ‘श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड पुरस्कृत असलेले ‘श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक’ देखील  ऋतुजा पाटील यांनी मिळवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित १६ व्या दीक्षांत सोहळा समारंभात महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणीस यांच्या हस्ते ही दोन सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे देऊन ऋतुजा पाटील यांना सन्मानित करण्यात आले. १९९८ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी एकत्र येऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून उच्च तंत्रशिक्षणाची सोय निर्माण करून दिली. आता मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे वाढतोय. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक निकालात स्वेरीचा विशेष दबदबा नेहमीच राहिलेला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर पहिल्याच बॅचची विद्यार्थिनी कु.रुपाली पवार हीने शिवाजी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळवले होते. कु. ऋतुजा नागेश पाटील यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ‘दुहेरी सुवर्णपदक’ मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज,स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी ऋतुजा पाटील यांचे अभिनंदन केले. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago