ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर औद्योगिक सुरक्षा सप्ताह.

चंद्रभागानगर, भाळवणी दि.04- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे याचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ ग्रहण करुन करण्यात आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम यांनी 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजारा करण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेला फार महत्व आहे. सुरक्षेचे नियम केवळ या सप्ताहापुरतेच मर्यादित न ठेवता आयुष्यभर सुरक्षा नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले. तसेच काम करीत असताना अपघात होवुन,स्वत:वर व आपल्यावर अवलंबुन असणाऱ्या  कुटुंबावर परिणाम होवू शकतो याचे भान काम करीत असताना सर्वांनी ठेवले पाहिजे. आयुष्यभर अपघात विरहित काम करुन,स्वत:बरोबरच आपले कुटुंब सुरक्षित रहावे याची दक्षता घ्यावी.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे,चिफ इंजिनिअर एस.एन.औताडे,प्रॉडक्शन म्ॉनेजर एन.एम.कुंभार,डेप्यु.चिफ.अकौंटंट बी.एस.सोनवले,एन.व्ही.कौलगे,कार्यालय अधिक्षक सी.एस.गायकवाड,गोडाऊन किपर कल्याण जाधव,असि सुरक्षा आधिकारी बी.एस.पिसे,जमादार मनसुब सय्यद, सुरक्षा जवान व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन लेबर ऑफिसर आर.बी.जाधव यांनी केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

12 hours ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

5 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

6 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago