सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे.
कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्ल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय मानेही जखमी झाला आहे.अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक असल्याची माहिती आहे. अमर आटपाडकर यांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…
पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…
कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…