कुटूंब घरातील लग्नकार्यात व्यस्त,चोरटयांनी साधली संधी

पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या इसबावीत गेल्या काही महिन्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत असून मोटारसायकची चोरी हि तर नित्याची बाब झाली आहे.इसबावीच्या बसवेश्वर नगर येथे राहणाऱ्या पोरे कुटूंबास असाच चोरीचा मोठा फटका सहन करावा लागला असून घरात मुलीचे लग्नकार्य असल्याने सारे कुटुंब वाखरी येथे लग्नकार्यात व्यस्त असताना चोरटयांनी संधी साधत बसवेश्वर नगर येथील घरात मागील दारातून प्रवेश करीत कपाटातील २ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
    या बाबत गुलाब दिगंबर पोरे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली असून चोरीस गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याचे वर्णन खालीलप्रमाणे :1)1,30,000/-रु किंमतीचे एक सोन्याचे इंद्रजित मंगळसुत्र 28.850ग्रँम वजनाचे 2) 21,000/-रु किंमतीची एक सोन्याचे मिना वर्क वाटी 4.70ग्रँम वजनाची 3) 43,000/-रु किंमतीचे एक सोन्याचे टप्स जोडी कानातील वेल 8.470ग्रँम वजनाचे 4) 19,000/-रु किंमतीची एक सोन्याचे टप्स जोडी 3ग्रँम वजनाची 5) 1 500/- रु किंमतीची एक जोडी 2 भार वजनाची चांदीची अशी एकूण अंदाजित किंमत 2,14,500/- हा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि ३८०,४५४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

20 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago