ताज्याघडामोडी

कोरोनाबाधित महिलेकडे डॉक्टरची शरीर सुखाची मागणी

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरने कोरोनाबाधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी या प्रकारानंतर रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी एक महिला पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात रुग्ण दाखल झाली. एक आयुष डॉक्टर या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन तिला सतत फोन करीत होता. डॉक्टरने मंगळवारी रात्री दोन वाजता या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती.

नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाली. रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला. त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत सादर करावा, असे आदेश दिले. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago