सरकोली येथे अवैध वाळू उपशावर पुन्हा तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे.   

  रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना  सरकोली हद्दीतून भीमा नदीतून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली असता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पांडूरंग बाळासाहेब कराळे वय 27 वर्ष रा सरकोली ता. पंढरपूर 2) शेतमालक सागर बाबुराव माने रा, सरकोली 3)३) जेसिबी मालक सुनिल काका भोसले रा. सरकोली 4)जिवन दत्तात्रय भोसले रा, सरकोली ता. पंढरपूर यांच्या विरोधात भा.द.वि. 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क) (1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
         

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago