ताज्याघडामोडी

पराभूत उमेदवाराकडून नूतन महिला सरपंचास व कटूंबास मारहाण

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. यावेळी जनतेतून सरपंच निवड नसल्यामुळे अनेकठिकाणी सरपंचपदासाठी घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी वाद झाले. पुणे जिल्ह्यातील मोहकल येथे पराभूत उमेदवाराने नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबाला घरात घुसुन बेदम मारहाण झाली. खेड तालुक्यातील मोहकल गावातील ही घटना आहे. आश्विनी मारुती भागवत असे मारहाण झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यात जवळपास १२ हजार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवरील दोन गट समोरासमोर भिडतात आणि यातून या निवडणुका अतिशय चुरशीच्या होताना दिसून येतात.ज्या गावामध्ये विकासाच्या मुद्यावर एकमत होते तेथे निवडणुका बिनविरोध पार पडत असल्याचेही दिसून आले.अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी-तिरंगी लढती झाल्या,या मध्ये आरोप प्रत्यारोपाचा गदारोळही पाहावयास मिळाला पण बहुतांश ठिकाणी निडणुकीपुरते राजकारण हीच भूमिका घेतली गेल्याने हि सारी प्रक्रिया शांततेत पार पडली.पण याच वेळी काही  ग्रामपंचायत निवडणुकीत मुद्याचा विरोध का गुद्यावर आला असल्याचे दिसून आले.मात्र थेट नूतन महीला सरपंचास व तिच्या कुटूंबास मारहाण करण्याची हि पहिलीच घटना ठरली आहे.    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

22 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago