पंढरपूर- तालुक्यातील रोपळे येथील सरपंच पदाच्या निवडीवर रोपळे विकास पॅनलने सलग दुसर्या दिवशी बहिष्कार टाकला असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नूतन सदस्यांनी दिला आहे.यावेळी रोपळे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास प्रमोद गणगे, अनिल कदम, सिध्देश्वर भोसेले, विलास भोसले, हनुमंत कदम, विष्णू खरे आदी उपस्थित होते.
रोपळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंधरा पैकी तेरा सदस्य रोपळे विकास पॅनलचे विजयी झाले आहेत. मात्र सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असून या जमातीचा उमेदवार सत्ताधारी गटाकडे नाही. दरम्यान या पदासाठी एकमेव निवडून आलेल्या उमेदवार शशिकला दिलीप चव्हाण यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान अर्ज दाखल करताना याबाबत सर्व पुरावे सादर करण्यात आले होते. यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे चव्हाण यांनी पाठबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना मागील वर्षी याच विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देखील दिली असल्याचा पुरावा ग्रामस्थांनी सादर केला. चव्हाण यांचे सरपंदपद धोक्यात येणार असल्यानेच त्यांच्या गटाच्या दिनकर कदम यांनी ग्रामपंचायतीच्या रजिस्टर मध्ये देखील खाडाखोड केली आहे. याबाबत दोन दिवसापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला आहे.
सदर सर्व पुरावे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. यामुळे शशिकला चव्हाण यांचे सरपंचपद रद्द करावे अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…