भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचे पतीसह असलेले छायाचित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याचा घृणास्पद प्रकार केला जात असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात माता भगिनींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भाजपाचे प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या संघर्ष करीत आलेल्या नेत्या आहेत.पुरोगामी म्हणून देशात ओळख असलेल्या या महाराष्ट्रात केवळ राजकीय द्वेषातून महिला नेत्यांविरोधात सोशल मिडीयावर अतिशय घृणास्पद टीका टिपण्णी करणे हा प्रकार घडत असतानाच आता त्यांचे छायाचित्र मॉर्फ करून बदनामी केली जात आहे.तरी या प्रकरणी सखोल तपास करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर न.पा.भाजपा पक्षनेते अनिल अभंगराव,पंढरपूर शहर अध्यक्ष विक्रम शिरसट,जिल्हा सरचिटणीस बादल ठाकूर,शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अपर्णा ताटके,उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी,प्रदेश कार्यकारिणी सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या सह्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…