ताज्याघडामोडी

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

 पंढरपूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निर्भया पथक पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’ चे आयोजन करण्यात आले होते. येथील छत्रपती शिवाजी चौक, विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ आणि भादुले चौक या ठिकाणी ‘कोरोना’ या वाढत्या महामारी पासून नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासाठी व शहरातील नागरिकांमध्ये समाज प्रबोधन करून जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

          स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. यशपाल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीचे विद्यार्थी वैष्णवी रोटे, प्रशांत माळी, मदन पाटील, अभिजीत रोटे, ऐश्वर्या विरधे, सारिका मोरे, सोनाली गायकवाड व शितल ताटे यांनी या पथनाट्यात सहभाग घेतला होता. पथनाट्याचे उदघाटन पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वेरीचे विद्यार्थी या पथनाट्यामधून नागरिकांनी मास्कचा व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आणि आपसात ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळण्याचे जनतेला आवाहन करत होते. स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा  असलेल्या नागरिकांनी पथनाट्याद्वारे मिळालेल्या सूचनांचे, संदेशाचे पालन करण्याचेही आश्वासन दिले. पथनाट्यातून लग्न समारंभाला होणारी गर्दी, चौकाचौकात होणारी नाहक तरुणांची गर्दी, दर्शनासाठी होणारी भक्तांची व वारकऱ्यांची गर्दी आणि पोलिस दिसताक्षणी नागरिकांचे चेहऱ्यावर मास्क लावणे. अशा बारीक सारीक बाबींचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी पथनाट्य तयार केले होते. एकूणच पथनाट्यांद्वारे ‘गर्दी टाळा, काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करा’ हाच संदेश स्वेरीचे विद्यार्थी देत होते. यातूनच स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे मनोरंजनातून उत्तमरित्या जनजागृती केली. यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार, निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, निर्भया पथकातील पोलीस कर्मचारी म.पो.कॉ.कुसुम क्षिरसागर, चंदा निमंगरे, नीता डोकडे, पो.कॉ.अरबाज खाटीक, गणेश इंगोले, महेश काळे, पो.हे.कॉ. अविनाश रोडगे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago