ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती इलेक्ट्रॉनिक रिक्षा भेट

वेणू  सोपान वेल्फेअर फाउंडेशन, पुणे व अँड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांनी
श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येकी एक नग प्रमाणे एकूण दोन नग इलेक्ट्रीक रिक्षा श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून दिल्या. त्याचा लोकार्पण सोहळा आज रविवार दिनांक २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी स.१०.०० वाजता श्री.संत नामदेव पायरी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास मा. न्यायाधिश पंढरपूर श्री.अच्युत कराड, संस्थापक व्यसनमुक्त युबक संघ ह.भ.प.
बंडातात्या कराडकर, संत नामदेव महाराज वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळयाचे वंश परंपरागत चोपदार ह.भ्‌.प.राजाभाउ चोपदार, संस्थापक वारकरी पाईक संघटना पंढरपूर ह.भ.प.राणा महाराज वासकर तसेच मंदिर समितीचे मा.सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्‍्वर महाराज
जळगांवकर, अँड.माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी श्री.बिठ्ठल जोशी, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड
तसेच सौ.वंदना बबनराव गायकवाड अध्यक्षा वेणू सोपान वेलफअर फाउंडेशन उपस्थित होते. तसेच मंदिर समितीचे कर्मचारी ब भाविक उपस्थित होते.
सदरच्या दोन्ही इलेक्ट्रीक रिक्षा चौफाळा ते मंदिर व महाद्वार ते मंदिर दरम्यान अंध, अपंग, वयस्कर, गरोदर महिला इत्यांदीसाठी वापरण्यात येणार आहेत. या दोन्ही रिक्षांची अंदाजित किंमत रू.९.००/- लक्ष आहे. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर व मास्क चा वापर करण्यात येवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.

 

 

 

 

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago