पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे.
विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा, फसवणूक आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीत घडली. या प्रकरणात आणखी नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे.
त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली.
गुन्ह घडलेल्या कालावधीत तो अध्यक्ष होता. गुन्ह्यातील रक्कमेबाबत तपासणे करणे, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, इतर गुन्हा दाखल असलेल्यांच्या शोधासाठी, तसेच, गुन्ह्याची व्यापी मोठी असून, त्याच्याकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी केली.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…