प्रचंड आग्रह तरीही जनसंवाद सभेत आ.संजयमामाचा भाषणास नकार

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे स्व. भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात काढण्यात येणाऱ्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ काल मंगळवेढा येथून करण्यात आला.यावेळी आयोजित राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.या वेळी उपस्थित जनसमुदायासमोर या नेत्यांनी स्व.आ.भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे अपुरे काम पुढे नेण्यासाठी भगिरथ भालके यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष ठाम राहील अशी ग्वाही देत लवकरच होणाऱ्या पोटनिवडणुकीत भगिरथ भालके हेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार असतील हे ठामपणे सांगितले.मात्र यावेळी आ.संजयमामा शिंदे यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात आल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यास नकार दिला.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लतीफ तांबोळी यांच्यासह मंचावरील इतरांनीही आ.शिंदेंना भाषणासाठी प्रचंड आग्रह केला,अक्षरश हाताला धरून उभा केले मात्र आ. संजयमामा शिंदे हे कुठल्याही परिस्थितीत भाषण करण्यास राजी नसल्याचे दिसून आले.हा प्रकार मंचावर बराच वेळ सुरु होता,निदान आ.शिंदेनी जयंती निमित्त अभिवादनपर चार शब्द तरी बोलावेत असा आग्रह उपस्थित जनसमुदायातूनही करण्यात येऊ लागला तरीही आ.संजयमामा शिंदे हे ठाम राहिल्याचे दिसून आले.         

        मात्र या साऱ्या घड्मामोडी नंतर उपस्थित जनसमुद्यात मात्र वेगळीच चर्चा होताना दिसून आली.२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांनी भाजपशी दोस्ताना करत जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रयोग करून जिल्हा परिषदेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला प्रथमच सुरुंग लावला होता.यावेळी त्यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील भालके विरोधक गटाचे आ.प्रशांत परिचारक आणि दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांची मोलाची साथ लाभली होती.आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्यात यशस्वी ठरलेल्यांचा ”दोस्त ग्रुप” हि चर्चेत आला.पुढे लोकसभा निवडणुकीवेळी आ. संजय शिंदे हे राष्ट्रवादीत गेले.आ.संजय शिंदे आणि अकलूज यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत असल्यानेच व मा.खा.विजयसिह मोहिते पाटील सर्मथकांनी भाजपात प्रवेश केल्यानेच संजय शिंदे हे भाजपापासून दुरावले अशीही चर्चा झाली होती.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदार संघातून शिंदे हे राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले खरे पण सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत त्यांनी थेट देवेंद्र फडणीवस यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला होता.आणि आ.संजयमामा शिंदे यांच्या या बदलत्या भूमिकेबद्दल जिल्ह्यात राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी पसरली होती.पण महाविकास आघडीची मोट बांधली गेली आणि आ.शिंदे हे ”गुपचूप” राष्ट्रवादीच्या गोटात परतले.   

      काल स्व.भारतनानांच्या जयंतीदिवशी आयोजित कार्यक्रमात बोलण्याचा प्रचंड आग्रह करूनही आ.संजयमामा शिंदे यांनी बोलण्यास नक्की कशामुळे नकार दिला या बाबत त्यांना बोलण्यासाठी वारंवार हाताला धरून उठविण्याचा प्रयन्त करणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लतीफ तांबोळी यांच्याकडे विचारणा केली असता विधानपरिषदेच्या पद्वीधदार व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मी आणि आ.संजयमामा हे दोघेही जिल्ह्यात फिरत असताना त्यावेळीही त्यांनी ११ ठिकाणी सभा आ.संजयमामा बोलले नाहीत तसेच ते याठिकाणीही बोलले नाहीत त्याच बरोबर या कार्यक्रमाची वेळ ४ वाजताची होती,मात्र कार्यक्रम ७ वाजता सुरु झाला.खूप मोठा जनसमुदाय बराच वेळ थांबून होता व अनेक मान्यवरांची भाषणे बाकी होती त्यामुळेच त्यांनी भाषण टाळले अशीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago