गुन्हे विश्व

अखेर तो ”डॉन ?” तुरूंगातून बाहेर येणार

पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असली तरी या शहरात ”डॉन” आणि फोल्डमॅन ची कमतरता नाही असे म्हटले जाते.पुणे शहरात प्रचंड हवा असलेले नाव म्हणजे गजानन मारणे होय.नुकतेच मोक्का न्यायालयाने त्याची एका हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्यानंतर मारणे  आता तुरूंगातून बाहेर येणार आहे. 

           अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष झाल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळीतील सदस्य संतोष ऊर्फ पप्पू हिरामण गावडे याच्या खूनप्रकरणीही मारणेसह इतर आरोपींची विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.या खटल्यात बचाव पक्षातर्फे सुधीर शहा,ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. विपुल दुशिंग व ॲड. जितू सावंत, ॲड. राहुल भरेकर आणि ॲड. विद्याधर कोशे यांनी काम पाहिले.

              मात्र जे सामान्य जनतेच्या डोळ्याला दिसते,ज्याचा अनुभव सामान्य जनता घेते ते न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी सक्षम पुरावे लागतात.याचीच परिणीती म्हणून गजानन मारणे आता तुरूंगातून बाहेर येणार आहे.      

गावडे याचा 3 नोव्हेंबर 2014 रोजी मध्यरात्री लवळे येथील गावडे वस्तीजवळ कोयता, सुऱ्याने वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश ज्ञानेश्‍वर जाधव (वय 22, रा. कोथरूड) याने पौंड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गजानन मारणे (रा. कोथरूड) याच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल आहे.

एक जण फरार असून, त्यापैकी 17 जणांची मुक्तता झाली. या खुनानंतर गजानन मारणे आणि नीलेश घायवळ या टोळ्यांमध्ये पुन्हा भडका उडाला होता. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago