अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि इतर तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली उपसमिती गठीत केली जाणार आहे. सात जणांची ही उपसमिती कुलगुरू डॉ. फडणवीस या गठीत करतील. स्मारकासाठी शासनाकडून दीड कोटी तर विद्यापीठ फंडातून दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकूण तीन कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटींचा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा श्री. सामंत यांनी केली. तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…
पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…
कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…