ताज्याघडामोडी

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे.

धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम मोदी हे लोकांना … बनवायचं काम करतात, अस वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

खासदार हे सर्व मंत्र्यांच्या आणि महिलांच्या उपस्थितीत हा वादग्रस्त शब्द वापरला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदग्रहण समारंभाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेस प्रमुख नेते उपस्थितीत होते.आज आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत. मोदी सरकार मनमानी काम करत आहे, त्याशिवाय केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. हा देशाच्या संविधांवर घाव आहे. चीनने लडाख मध्ये जमीन काबीज केली आता ते सोडायला तयार नाही. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे आव्हान आहे. या निमित्ताने भाजप पाळंमुळं काढली पाहिजे. कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे साथ आहोत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago