ताज्याघडामोडी

घाबरू नका,इंटरनॅशनल डॉन माझ्या ओळखीचे आहेत !

शिवसेनेने भाजपात गेलेल्या नाईक गटाचे नगरसेवक फोडल्याने गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागले असून आपल्या समर्थकासमोर बोलताना त्यांनी  घाबरू नका,इंटरनॅशनल डॉन माझ्या ओळखीचे आहेत ! असे विधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  यावर शिवसेनेने देखील लगेचच प्रत्यूत्तर दिले असून गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेत गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे.गणेश नाईक समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात असे वादग्रस्त विधान करीत गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांना धीर देण्याचा प्रयत्न केला असला तरी आता त्यांच्या या विधानाचे पडसाद राज्यात उमटणार असून साधन शुचितेचे महत्व सांगणाऱ्या भाजपाच्या राज्याच्या नेत्याकडून आता काय प्रतिक्रया व्यक्त होतात याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago