शिवप्रतिमेस अभिवादन करताना एकावेळी केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीची अट
यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा हा नेहमीच्या जल्लोषात साजरा होईल अशी चर्चा दोन दिवसापासून होत असतानाच व राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या बाबत संकेत दिलेले असतानाच आज राज्य शासनाने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता यात अनेक निर्बंध लादण्यात आल्याचे दिसून येत असून यात १९ फेब्रुवारी रोजी गड किल्ल्यावर गर्दी न करता साधेपणाने जयंती साजरी करावी,शिजयंतीच्या निमित्ताने प्रभात फेरी काढणे,मोटार सायकल रॅली काढणे,सार्वजनिक ठिकाणी पोवाडे,व्यख्यान,नाटके आदींचे सादरीकरण करणे,अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणी प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी एकावेळी १० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.मात्र आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर आयोजनास सोशल डिस्टेनसिंग पाळत आयोजन करण्यास परवानगी दिली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…