खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी म्हणजे 13 मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि 14 मार्च रोजी रविवार असल्यानं बँका बंद राहतील.
मात्र या संपाच्या चर्चेने सामान्य जनतेमध्ये मात्र नाराजी असून नेमके शनिवार-रविवारला जोडून बँक कर्मचारी संप करतात आणि सुट्टीचा आनंद घेतात त्याच वेळी सामान्य जनतेचे अर्थकारण मात्र ठप्प होते.हे कर्मचारी संघटित असल्याने शासन यांच्या दबावापुढे झुकते व कारवाई करत नाही अशीच भावना व्यक्त होताना दिसून येत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…