सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे,
पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आठ जणांची नाव ठेवली लिहून होती. त्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार, सुनिल पंडित यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मृत खेडेकर यांची मूलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहेअव्वाच्या-सव्वा व्याज लावून कर्जही वसूल केले. या व्यवहारातून खेडेकर यांनी मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…