पंढरपूर, दि. 03:- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत निराधार अनुदान योजनेची 68 प्रकरणे मंजूर करण्यात आली. समीतीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे 46 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 22 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.
राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असे आवाहन तहसिलदार साळुंखे यांनी केले आहे.
तालुक्यातील जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदानाचा लाभ घेत आहे आहेत. अशा लाभार्थ्यांनी माहे जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष हजर राहून सादर करावेत. अन्यथा माहे एप्रिल 2021 पासन संबधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार साळुंखे यांनी केले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…